न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० ऑगस्ट २०२२) :- निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथील पीएमपीएमएल आगारासमोर एचडीएफसी बँकेचे एटीएम आहे. येथे चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपींनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलली. मशिनची छेडछाड करून मागील स्वीच वायर काढली.
त्यानंतर मशिन तसेच मशिनमधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. दिनेश धोंडिराम शिर्के (रा. मोहितेवाडी, शेल पिंपळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. राजेंद्र पोपट बडे (वय ३५, रा. जोगेवाडी, पो. चिचपूर पांगुर, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), कृष्णा धुल्या रजपूत (वय २८, रा. शिगाव, पुणे), शुशांत किशोर घोडेस्वार (वय २४, रा. वडारवाडी, चतुःशृंगी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















