न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२२) :- सोसायटीच्या सहखजिनदार फिर्यादी यांच्या सोसायटीमध्ये आरोपींचा फ्लॅट आहे. तो फ्लॅट आरोपींनी एकाला भाड्याने दिला आहे. फ्लॅटमधील नळ सुरु ठेऊन पाणी वाया घालवत असल्याबद्दल फिर्यादी व सोसायटीच्या इतर सभासदांनी त्यांना जाब विचारला.
त्याउलट तुम्ही आमच्या भाडेकरूकडे का आलात म्हणत फ्लॅटच्या मालकाने इतरांना उलट जाब विचारला व आरोपींनी फिर्यादी यांना, त्यांच्या पतीला आणि इतर लोकांना शिवीगाळ केली. त्यांना मारण्याची धमकी दिली. फिर्यादींसोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार शनिवारी (दि. २०) रात्री मोशीतील शिवाजीवाडी येथे घडला.
पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजकुमार सस्ते (वय ६०), मयूर सस्ते (वय ३०), महिला (वय ५५) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















