न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२२) :- लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाल्यानंतर आज शनिवारी घरोघरी गोराईचे आगमन होत आहे. गौराई म्हणजे महिलावर्गाचा जीव की प्राण ! अक्षरशः वर्षभर महिला लाडक्या गोराईची प्रतीक्षा करीत असतात. महिला वर्गात गोराईच्या स्वागताच्या तयारीची लगबगही सुरू झाली आहे. गोराईच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी महिलांची बाजारपेठेत गर्दी झाली होती. माहेरवाशिणी असलेल्या गौरींचं आज शनिवार (दि. ३) सायंकाळी आवाहन होणार आहे. या पार्श्वभूमीवर सगळा महिलावर्ग तयारी करण्यात दंग झाला आहे.
यंदा गौरींसाठी रेडिमेड साडी आणि दागिन्यांची रेलचेल असल्याने खरेदीला वेग आला आहे. गौरी ही माहेरवाशीण असते. म्हणजे जशी एखादी स्त्री चार दिवस माहेरी येते आणि आपली सगळी हौस पुरवून घेते त्याचप्रमाणे गौरीदेखील तीन दिवसांची पाहुणीच असते. तिच्यासाठी विविध पदार्थ केले तयार केले जातात.
प्रथा परंपरेनुसार पुरळपोळी किंवा इतर पदार्थ नैवेद्य दाखविला जातो. गौरी माहेरवाशीण म्हणून तीन दिवस राहतात. त्यांचे येणे आणि त्यांना सजवता सजवताचं घरातली स्त्री आपली नटण्या – मुरडण्याची हौसदेखील भागवून घेते. महिलावर्ग गौरीपुढे मोठी आरास करत असतात, त्यासाठी लागणाऱ्या मिठाई, फराळाचे पदार्थ, फळे, पूजेचे साहित्य खरेदीत महिला व्यस्त आहेत. बाजारात मुखवटे, दागिने, साड्या घेण्यासाठी महिलांची लगबग सुरु आहे.















