न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२२) :- भोसरीतील पीसीएमटी चौकात कर्तव्य बजावत असताना शुक्रवारी (दि. २) सायंकाळी सव्वासातच्या दरम्यान आरोपी त्यांच्या दुचाकीवरून विरुद्ध दिशेने आले. फिर्यादी यांनी त्यांची गाडी अडवून वाहन परवाना मागितला. आरोपीने तो दाखवला.
पुढे चुकीच्या दिशेने आल्याची कारवाई करत असल्याचे सांगताच दोघेही हुज्जत घालत फिर्यादीच्या अंगावर धावून आले. पोलीस हवालदार दत्तू विठोबा बोराडे (वय ४९) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शोयब अशरफ शेख (वय २५ रा.दिघी रोड भोसरी) व आदित्य मुंकंद लोंढे (वय २४ रा. दिघी रोड भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.















