न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग्रीन मार्शल पथकातील कर्मचाऱ्यांचे पथक तपासणीसाठी शनिवारी थेरगाव परिसरातील लक्ष्मी स्वीट दुकानात गेले. दुकानाच्या ड्रॉव्हरमध्ये असलेल्या प्लास्टीकच्या बॅग जप्त करण्यासाठी मागितल्या असता आरोपीने नकार देत पथकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पथकातील महिला कर्मचाऱ्यासही धक्काबुक्की केली.
शेजारीच असलेल्या दुकानात हे पथक कारवाईसाठी गेले असता तिथे येऊन चौघांनी तुम्ही आमच्या दुकानात तपासणीसाठी आलात कसे म्हणत हाताने मारहाण कऱण्यास केली. तसेच हातातील वस्तूने फिर्यादीच्या गालावर मारत त्यांना जखमी केले. हा प्रकार शनिवारी (दि. २) दुपारी बाराच्या सुमारास घडला.
निलेश गणपत कांबळे (वय ३९) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करीत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी हिंम्मतलाल भाटी, त्याचा मुलगा राम भाटी व रामचा मित्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.















