न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२२) :- कचऱ्याचा डबा घरासमोर ठेवल्याच्या कारणावरून एकाचे फिर्यादीच्या वडिलांशी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपी फिर्यादीच्या घरात शिरले. फिर्यादीच्या कपाळावर लोखंडी फायटरने मारून जखमी केले.
त्यानंतर दोन्ही आरोपींनी त्यांना हाताने व बुक्क्यांनी मारहाण करीत दमदाटी केली. उद्धव श्रीकृष्ण सोमाणी (रा. प्रज्ञा हौसिंग सोसायटी, संत तुकारामनगर, पिंपरी) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमन अयाज शेख (वय १८), पार्वती किशन कलापुरे (वय ६५, दोघेही रा. प्रज्ञा हौसिंग सोसायटी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.















