न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२२) :- चिंचवड येथे सोसायटीच्या पार्किंगमध्ये गुरुवारी (दि. १) रात्री साडेदहा वाजता दुचाकी पार्क केली. रात्रीच्या वेळी फिर्यादी यांची २० हजारांची दुचाकी चोरून नेली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मनोज मोहन पाटील (वय ४१, रा. चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
भोसरीत २० हजारांची दुचाकी फिर्यादी यांनी गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजता नाशिक फाट्यावरील पुलाच्या खाली पार्किंगमध्ये पार्क केली. दिवसभरात अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. सागर प्रकाश दुधाने (वय ४३, रा. पिंपळे सौदागर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.















