न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२२) :- फ्लॅट पाहिजे असल्याचे आरोपीने फिर्यादीला फोन करून सांगितले. आर्मीत असल्याचे सांगून डिपॉझिट भरण्यासाठी फिर्यादीचे बँक डिटेल्स व्हॅट्सऍपवर पाठविण्यास सांगितले.
आरोपींनी एचडीएफसी बँक अकाउंट क्रमांक फिर्यादी यांच्या वडिलांना पाठवून त्यांच्या बँक अकाउंटला ऍड करण्यास सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक अकाउंटवर पैसे भरण्यास सांगून फिर्यादीची एक लाख ९० हजारांची फसवणूक केली.
ही घटना निगडी येथे घडली. विवेकानंद कल्याणी मुदकन्ना (रा. प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल झाला आहे.















