न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२२) :- चिखलीतील बगवस्ती येथे फिर्यादीच्या सना कार्पोरेशन गोडाऊन येथे काम करणाऱ्या वाहन चालकाने व त्याच्या साथीदाराने मागील एक महिन्यांपासून दोन लाख रुपये किमतीचा तीन टन ८०० किलो वजनाचा माल चोरला.
अब्दुल जलील अन्सारी (रा. बगवस्ती, पाटीलनगर, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मयूर सुशील पाटील (वय २६, रा. बगवस्ती, पाटीलनगर, चिखली) याला अटक केली असून अजय कांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.















