न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२२) :- केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा जवळ बाळगला. हा गुटखा आरोपीला एकाने पुरविला. राज्यात गुटखा व पानमसाला यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करण्यास बंदी आहे. असे असताना आरोपीने ४ हजार ७२ रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा जवळ बाळगला.
पोलीस नाईक विपुल जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेश मुल्लाराम चौधरी (वय ३३ रा. काळभोर नगर पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर फेरीवाला गायकवाड (रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी (दि. ३) सायंकाळी काळभोरनगर येथे केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.















