- दुचाकीस्वाराकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२२) :- चाकण वाहतूक विभागाच्या वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलसह मदतनिसाला दुचाकीस्वाराकडून सात हजारांची लाच घेताना पकडले असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
चाकण वाहतूक विभागाच्या वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने एका दुचाकीस्वाराला वाहतूक नियम तोडल्यामुळे मंगळवारी संध्याकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास पकडले होते. या वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराकडून कारवाई न करण्यासाठी मदतनिसाने १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती.
दुचाकीस्वाराकडून तडजोडीनंतर लाचेची रक्कम कमी करून सात हजार रुपये करण्यात आली. सात हजार रुपये रक्कम स्वीकारताना वाहतूक कॉन्स्टेबल व त्याच्या मदतनिसाला पोलिसाला ताब्यात घेतले आहे. या दोन्ही आरोपीविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.