न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२२) :- ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला महावितरणचा एक टोल क्रमांक बदलण्यात आला असून नवीन नंबर १८००-२१२-३४३५ असा असणार आहे. तर पूर्वीपासून सुरू असलेल्या १८००-२३३ ३४३५ १९९२ व १९९२० या क्रमांकात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
खंडित वीज पुरवठ्याच्या तक्रारीसाठी मिसकॉल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या क्रमाकात बदल करण्यात आला आहे. ग्राहक नोंदणीकृत मोबाइल क्रमांक ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिसकॉल देऊन आपली तक्रार नोंदवू शकतात. ग्राहक महावितरण मोबाइल अॅपद्वारे किंवा वरील टोल फ्री क्रमांकावर फोन करून आपला ग्राहक क्रमाक सांगून आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंद करू शकतात.















