न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२२) :- आंबेठाण येथील घाटेवस्ती येथे आरोपी दरोड्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घाटेवस्ती येथील पेट्रोलपंपाजवळ दुचाकीवर उभे असलेल्या दोघांना ताब्यात घेतले, उर्वरित तिघे पळून गेले. दोघांकडून पोलिसांनी लोखंडी रॉड, लोखंडी कटावणी, लोखंडी कोयता, दोन दुचाकी असा एकूण ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अधिक चौकशी केली असता त्यांनी दरोडा टाकण्यासाठी आल्याचे कबुल केले आहे. शनिवारी (दि. १०) रात्री साडेअकराच्या दरम्यान घडला. अभिषेक उर्फ बबलु उत्तम भालेराव (वय २१ रा. शिरोली, खेड) व सुरज संजय वाडेकर (वय २१ रा. शिरोली, खेड) अशी अटक केलेल्यांची नवे असून त्यांचे साथीदार निखील अशोक शिंदे (वय २०), मयुर कोंडिभाऊ गारगोटे (वय अंदाजे २०), जावेद निजाम शेख (वय २३ ) सर्व राहणार शिरोली, खेड हे फरार आहेत. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.















