न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२२) :- हाॅटेल व्यावसायिक आणि त्यांच्या घरातील सर्वजण शुक्रवारी (दि. ९) रात्री आठच्या दरम्यान घराला कुलूप लावून गणपती विसर्जन मिरवणुकीस गेले. तिथून शनिवारी (दि. १०) मध्यरात्री दीडच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले.
चोरट्यांनी घरातील कपाटातून १३ लाख ३५ हजार रुपयांचे सोने आणि ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचे लक्षात आले. अजय मख्खनलाल बजाज (वय ४९, रा. साई चौक, पिंपरी) यांनी शनिवारी (दि. १०) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.















