न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२२) :- बारावीच्या घटक चाचणी परीक्षेत चार विषयांत नापास झाल्याने मुलगा घरातून निघून गेला. त्याचा शोध घेऊनही तो मिळून आला नाही. हा प्रकार बुधवारी (दि. ७) सकाळी दहाच्या सुमारास दापोडी येथे घडला. बेपत्ता झालेल्या मुलाच्या वडिलांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. ८) भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा १६ वर्षीय मुलगा बारावीमध्ये शिकत आहे. नुकतीच बारावीची घटक चाचणी परीक्षा झाली. त्याचा निकाल लागला. त्यात फिर्यादीचा मुलगा चार विषयांत नापास झाला. यावरून बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास मुलाने घर सोडले. त्यानंतर फिर्यादींनी सर्वत्र मुलाचा शोध घेतला.















