न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२२) :- भूमकर चौकातील सीसीडी येथे फिर्यादी हे त्यांच्या मित्राला सोडून जात होते. यावेळी ते सबवेजवळ गेले असता दुचाकीवरील आरोपींनी त्यांना हाताने थांबण्याचा इशारा केला.
फिर्यादी यांनी गाडी थांबवून गाडीची काच खाली केली असता आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील १६.१९ ग्रॅम वजनाची ४८ हजार ५७० रुपयांची चेन हिसकावली. हा प्रकार मंगळवारी (दि. १३) रात्री साडेबारा वाजता घडला.
दिपक नथ्थु पाटील (वय २६ रा.वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















