न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२२) :- एका मुलीसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याच्या रागातून आरोपींनी तरुणाला प्रेमलोक पार्क येथे बोलावून त्याच्या डोळ्यात चटणी टाकली आणि डोक्यात लोखंडी रॉडने मारून गंभीर जखमी केले. हा प्रकार मंगळवारी (दि. १३) सायंकाळी प्रेमलोक पार्क चिंचवड येथे घडला.
विशाल अरुण कसबे (वय ३२, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. विशाल याचा भाऊ छतु अरुण कसबे (वय ४०) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रेम गायकवाड, अबीर गायकवाड, एक महिला (सर्व रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
















