न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला आरोपीने गांजा जवळ बाळगला असल्याची माहिती मिळाली. आरोपीच्या घरी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. कारवाईत एक लाख ९५० रुपये किमतीचा चार किलो ३८ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला.
आरोपीने हा गांजा एका महिलेकडून आणला असल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई मंगळवारी (दि. १३) दुपारी रमाबाईनगर,आणि रावेत येथील शिंदेवस्ती येथे करण्यात आली. मोहम्मद राजू नसरुद्दीन अली (वय २७, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ओटास्कीम, निगडी येथे राहणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.


















