न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२२) :- एअरटेल कंपनीचे इंटरनेट केबल पुरवण्याचा फिर्यादीचा व्यवसाय आहे. कंपनीचे सप्लायर केबल दुरुस्तीचे काम करत असताना आरोपी तेथे आला व त्याने सप्लायर व इतर कामगारांना काम करण्यास मनाई केली.
तसेच महिन्याला ” २० हजार रुपये हप्ता दे, नाही तर तुझे केबल तर तोडीनच पण तुझे हातपाय पण तोडीन, पुन्हा आलास तर मुळशी पॅटर्न करीन ” असे म्हणत खंडणीची मागणी केली.
हा प्रकार डिसेंबर २०२१ ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान मुळशी येथील आय. टी. पार्क परिसरात घडला. रोहीत संजय शिवले (वय ३६ रा.सोमवार पेठ, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश ओझरकर (रा. माण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.















