न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२२) :- ‘मी मोठ्या कंपन्यांना डबे पुरवते, माझ्या खूप ओळखी आहेत, मला तुम्ही एक लाख रुपये द्या, मी तुम्हाला ५०-६० लाखाची फर्निचरची ऑर्डर मिळवून देते,’ असे आमिष आरोपी महिलेने फिर्यादी महिलेला फोन करून दाखवले.
मोठी ऑर्डर मिळत असल्याने फिर्यादीकडे पैसे नसतानाही त्यांनी वडिलांच्या बॅंक खात्यातून महिला आरोपीला एक लाख रुपये पाठवले. परंतु, आरोपीने फिर्यादी यांना फर्निचरची ऑर्डर दिली नाही, तसेच पैसेही परत न देता फसवणूक केली. फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.