न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या गोरगरीब नागरीकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. अन्यथा बसपाचे प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देशाचे प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ आदेशाने आगामी काळात बहुजन समाज पार्टीच्या वतीने मुंबईत विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा गुरुवारी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी दिला आहे.
गुरुवारी (दि. २२) बसपाच्या वतीने डॉ. चलवादी यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून मनपा भवन समोर “परिवर्तन मोर्चा” काढण्यात आला. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना डॉ. चलवादी बोलत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे मुंबई महामार्गावरून मोरवाडी चौकातून पिंपरी चिंचवड मनपा भवन येथे मोर्चा काढण्यात आला नंतर सभा घेण्यात आली. सभेनंतर आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात ज्येष्ठ नेते टेक्सास गायकवाड, पक्षाचे प्रदेश सचिव सुरेश गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष धम्मदिप लगाडे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुशिल गवळी, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा गायकवाड, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष अनिल रणनवरे, महिला शहर अध्यक्षा ज्योतीताई लांडगे तसेच धम्मदिप लगाडे, बलराज कटके, बन्सी रोकडे, प्रवीण वाकोडे, रमेश केशव, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब सरवदे, मधुकर इंगळे, सुनील चटोले, अनिल रणवरे, राजेश डावरे, विकी पासोटे, विकास सूर्यवंशी, सुरज गायकवाड, अर्जुनसिंग पोवार, महेश प्रक्षाळे, कल्याण ओव्हाळ, राजूभाऊ निकाळजे, दीपक भालेराव, अरविंद म्हस्के, प्रवीण साखरे, मंदाकिनीताई भोसले आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.