न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२) राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे.
या सेवा पंधरवडा अंतर्गत (दि. २२) गुरुवारी आ. महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार भारतीय जनता युवा मोर्चा पिं.चि.शहर आणि श्री दिनेश लालचंद यादव युवा मंचच्या संयुक्त विद्यमानातुन कुदळवाडी या ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व कुदळवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.