न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- तरुणीसोबत आरोपीचे प्रेमसंबंध होते. तिचे लग्न झाले तरी त्याने ते पुढे तसेच चालू ठेवले, तो तिला भेटायला जात असे यावरून प्रेयसीच्या पतीने त्याला जाब विचारला असता, आरोपीने प्रेयसीच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पतीने पत्नीला घेऊन गाव सोडले.
ते मारुंजीत राहायला आले. मात्र आरोपी हा तेथेही येऊ लागला. आरोपी व प्रेयसीच्या पतीसोबत भांडणे झाली. यावेळी आरोपीने जे करायच ते कर एक दिवस तुझा काटा काढतो, तुझ्या बायकोला मी घेऊन जाणार अशी पुन्हा धमकी दिली.
यातून मानसिकरित्या खच्चीकरण झाल्याने प्रेयसीच्या पतीनेच १७ सप्टेंबर रोजी मारूंजी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जुलै २०२२ ते १७ सप्टेंबर २०२२ या दरम्यान मारुंजीत घडली. अजिंक्य शिवाजी घुले (रा. बीड) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















