न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिका आवारात पडलेल्या भंगार साहित्याचा लिलाव करा, अशी सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
पावसाळ्यात टायर, भंगार साहित्य आणि बांधकामाच्या ठिकाणी पाणी साचून त्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. यामुळे अशी डासोत्पत्ती स्थानके निर्माण करणाऱ्या ८३८ जणांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.
महापालिकेच्या आवारात पडलेले सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे भंगार लिलाव करून त्याची विक्री करावी, अशी शिफारस याबाबत नियुक्त केलेल्या समितीने शुक्रवारी (दि. १६) केली. निविदा प्रक्रिया भांडार विभागामार्फत राबविण्यात यावी, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.















