न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- रिक्षाचे इ-चलन फिर्यादीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढले. याचा राग मनात धरला. फिर्यादी यांचे वरीष्ठ अधिकारी आरोपी व आरोपीच्या पत्नीला समजावून सांगत असताना त्यांना आरोपींनी उलट ” तुम्ही माझ्या बायकोशी गैरवर्तन करत आहात, म्हणून तुमचे पण नाव देतो”, असे म्हणत कारवाई न करण्यासाठी दबाव आणला व पोलिसांना शिवीगाळ केली.
ही घटना बुधवारी (दि. २१) सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान पिंपरीतील साई चौकात घडली. पोलीस हवालदार वृषिकेत पांडुरंग पाटील (वय ४५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रिक्षा चालक आनंद सुरेश हिरेकर (वय ३६ रा. पिंपरी) याला अटक केली असून त्याच्या पत्नी विरोधातही गुन्ह दाखल केला आहे.















