न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- एसबीआय बँकेची केवायसी अपडेट करण्यासाठी आरोपींनी लिंक पाठवली. बँकेची बनावट वेबसाइट तयार केली. फिर्यादीचे इंटरनेट लॉगिन आयडी व पासवर्ड संगणकीय साधनाद्वारे प्राप्त केले.
त्यानंतर फिर्यादीच्या खात्यातून परस्पर एक लाख ७ हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली. ललितकुमार कचरुलाल ओस्तवाल (रा. फुगेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे.















