न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- वर्तमानपत्रात आलेली जाहिरात वाचून फिर्यादीने त्यातील क्रमांकावर संपर्क केला. फोनवरील व्यक्तीने फिर्यादीकडून आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो, बँक स्टेटमेंटची मागणी केली.
सहा लाख रुपये कर्ज मंजूर झाल्याचे सांगून प्रोसेसिंग फी, तीन महिन्याचे ऍडव्हान्स हप्ते अशा कारणांसाठी २३ हजार २०० रुपये फिर्यादीकडून ऑनलाईन माध्यमातून घेतले. त्यानंतर इन्कम टॅक्स विभागात कर्ज अडकले असल्याचे सांगून कर्ज रकमेच्या पाच टक्के ३० हजार रुपयांची मागणी केली.
हा प्रकार ३० सप्टेंबर ते २२ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडला. विनायक नंदकुमार गोसावी (वय ५३, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक बात्रा नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.















