न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२२) :- घरी असताना फिर्यादीला बुधवारी दुपारी सव्वादोनच्या दरम्यान त्यांना 8514895466 या मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला. तुमचे एसबीआय योनो अकाउंट बंद झाले असून खालील लिंकद्वारे पॅन क्रमांक अपडेट करा, असे त्या मेसेजमध्ये सांगण्यात आले.
त्यानुसार फिर्यादींनी लिंकवर क्लिक करून त्यात आधारकार्ड आणि पॅनकार्डची माहिती भरली. त्या माहितीच्या आधारे अज्ञाताने फिर्यादी यांच्या खात्यातून ५८ हजार २१४ रुपये काढून घेत फसवणूक केली.
हा प्रकार बुधवारी (दि. २१) दुपारी शिवाजीपार्क, चिंचवड येथे घडला. सुनील जगन्नाथ ननवरे (वय ५४, रा. शिवाजीपार्क, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.















