न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड पिंपरी महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नियोजित डुडुळगाव येथील गृहप्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. गृहप्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) केंद्र शासनाकडून मंजूर झाला आहे.
प्रकल्पासाठीची परवानगी अंतिम टप्प्यात आहे. महिन्याभरात निविदाप्रक्रिया राबवून प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यामुळे आवास योजनेतील लाभार्थ्यांना ११०० सदनिका उपलब्ध होणार आहेत.
शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले. परंतु यापैकी केवळ चऱ्होली, बोऱ्हाडेवाडीमधील एकूण २ हजार ७३० सदनिकांच्या प्रकल्पाला गती मिळाली. उर्वरित चारपैकी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.















