न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते.
मात्र, आज सोमवार (दि. २६) रोजी घटस्थापना असल्यामुळे शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आज सभा होणार नसून थेट पुढच्या सोमवारी (दि.३) ऑक्टोबर रोजी जनसंवाद सभा होणार आहे.















