न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २६ सप्टेंबर २०२२) :- आपसात संगनमत करून फिर्यादीच्या दुकानात आरोपी ग्राहक बनून आले. आरोपी महिलेने व्यंकटेश ज्वेलर्स, लातूर या दुकानातून सोने खरेदी केल्याची पावती दाखवली.
१० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार देऊन मुलाच्या उपचारासाठी तातडीने पैसे पाहिजे, असे कारण सांगत फिर्यादीकडून ३० हजार रुपये घेतले. हा प्रकार १६ सप्टेंबर रोजी रात्री शिवनेरी ज्वेलर्स, वाकड येथे घडला. महिलेने दिलेला हार हा सोन्याचा नसून नकली आहे, हे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने रविवारी (दि. २५) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार आरोपी महिला (रा. गजानन महाराज मंदिर मठ, आळंदी), सुरज पांडुरंग निरपाल (वय २२, रा. औसा रोड, लातूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.















