- पती, सासू-सासरे आणि आई-वडिलांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२२) :- पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही आरोपींनी आपसात संगनमत करून तिचा विवाह लावून दिला. विवाहानंतर पतीने तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याने मुलगी गरोदर राहिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना १९ ऑक्टोबर २०२१ ते २४ सप्टेंबर २०२२ या दरम्यान सांगली आणि चाकण येथे घडली. महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती (वय २२), त्याचे आई, वडील आणि पीडित मुलीचे आई-वडील यांच्या विरोधात बालविवाह, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.