- रिक्षा चालकासह टोळक्याची टपरी चालकाला मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२२) :- फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ बसले असताना आरोपी रिक्षा चालक साथीदारासह तेथे आला व त्याने पैशांची मागणी करून फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी देत आरोपी निघून गेले.
सोमवारी आरोपी १२ साथीदारांसह टपरीवर आला. फिर्यादीला मारहाण करून पानटपरी फेकून दिली. ‘ महिन्याला हजार रुपये हप्त द्या, नाही तर टपरी जाळून टाकेन ‘ अशी धमकी देत दहशत निर्माण केली.
चाकण येथील पुणे-नाशिक रस्त्यावर शनिवारी (दि. २४) ते सोमवारी (दि. २६) या दरम्यान हा प्रकार घडला. कृष्णा शांताराम शिंदे (वय २४ रा. चाकण) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किशोर पाटील (वय २३ रा. चाकण) व मेहबुब मकबुल नदाफ (वय २१ रा.चाकण) व त्यांचे दहा ते बारा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील किशोर व मेहबुब यांना पोलिसांनी अटक केली आहे.