न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२२) :- महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेतर्फे अठराव्या ज्यूनियर मुलींच्या राज्य बॉक्सिंग स्पर्धा आयोजित केल्या आहेत. जोगेश्वरी (मुंबई) येथे ६ ते १० ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धा होईल.
स्पर्धेसाठी पिंपरी – चिंचवड जिल्हा बॉक्सिंग संघ जाहीर केला आहे. यासाठीची निवड चाचणी स्पर्धा पिंपरी येथे घेण्यात आली. पिंपरी – चिंचवड सिटी बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ खेडकर, उपाध्यक्ष विशाल वाळुंजकर यावेळी उपस्थित होते.
निवड चाचणी स्पर्धेसाठी पंच प्रमुख म्हणून मनोहर इंगवले, ऋषिकांत वचकल, राकेश यादव, नीतू सुतार यांनी काम पाहिले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जाणाऱ्या संघासोबत संघ प्रशिक्षक म्हणून सुकन्या सुर्वे व व्यवस्थापक म्हणून जितू कटारिया यांची निवड केली.
ऋषिकांत वचकल यांनी सूत्रसंचालन केले.
संघात निवड झालेले खेळाडू व वजन गट :- सारंगी सातपुते (४६ कि.), श्रद्धा तावरे (४६ कि.), इशप्रीत कटारिया (५२ कि.), आवेरी लाटे (५४ कि.), रेबिका दास (५७ कि.), श्रावणी काटकर (८० कि.).