न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२२) :- व्हाट्सअपद्वारे अनोळखी व्यक्तीने फिर्यादींशी संपर्क साधला. फिर्यादींना अॅप डाउनलोड करून त्यावर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यानंतर युएसडीटी क्रिप्टो करन्सी खरेदी करण्यास सांगून खरेदी केलेली क्रिप्टो करन्सी एका वेबसाईटवर ट्रान्सफर करायला लावली.
फिर्यादींनी तीन लाख ९१ हजार ३८५ रुपयांची क्रिप्टो करन्सी खरेदी केली. ती आरोपींनी दिलेल्या वेबसाईटवर पाठवली. मात्र आरोपीने फिर्यादींना त्याचे पैसे न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार ६ ते १४ मार्च या सुमारास पिंपरीतील मोरवाडी रोड येथे घडला.
विजयकोदंडारामन स्वामिनाथन (वय ६४, रा. मोरवाडी रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 85256047752, 81066450908, 7780946191 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.