न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२२) :- हॉटेलच्या फ्रीजमध्ये सडलेला कोबी पाहून तो वेळीच का फेकला नाही, असे फिर्यादीची आई आरोपीला बोलली. त्याचा राग मनात धरून आरोपीने हॉटेल मालकाची कॉलर पकडली. तसेच ‘ माझा आत्ताच्या आत्ता पगार द्या ‘ अशी मागणी केली. ‘ पगार नाही दिला तर मी तुमचा खून करीन ‘ अशी धमकी देत फिर्यादीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
हॉटेल मॅनेजरने मध्यस्थी करून भांडण सोडवले. फिर्यादीचे वडील यांनीही आरोपीला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र, आरोपी त्यांच्या अंगावर काठी घेऊन धावून गेला. हा प्रकार रविवारी (दि. २५) हिंजवडी फेज-२ येथील सॉलीटरी हॉटेलमध्ये सकाळी नऊ वाजता घडला आहे.
क्रिशांत राजीव अगरवाल (वय ३० रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कुक गौरहरी गिरीधारी मंडल (वय ३० रा. मुळ कोलकत्ता) याला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.