न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने १ जुलै ते ३० सप्टेंबरअखेर मिळकत कराचा ऑनलाइन भरणा केल्यास सामान्यकरात ४ टक्के सवलत देण्यात येत आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत.
दोन दिवसांत जास्तीत जास्त मिळकतधारकांनी ऑनलाइन कर भरून सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले.
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी गुरुवार (दि. २९) आणि शुक्रवार (दि. ३०) असे दोनच दिवस राहिले आहेत. त्यामुळे दोन दिवसांत जास्तीत जास्त मिळकतधारकांनी ऑनलाइन कर भरून सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.