- अत्याचारातून तरुणीला मुलगी; जबाबदारी टाळणारा गजाआड…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२२) :- लग्न झालेले असताना आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण केले. पीडित तरुणी त्यामुळे गरोदर बनली.
त्यातून तिला मुलगी झाली. आरोपीने लग्नास आणि तिच्या मुलीची जबाबदारी घेण्यास नकार दिला. ही घटना २० ऑक्टोबर २०२० ते आज दरम्यान रहाटणी, भुगाव व पिंपळे गुरवमध्ये घडली.
२९ वर्षीय पीडित तरुणीने वाकड पोलीस स्टेशनमध्ये शुक्रवारी (दि. ३०) फिर्याद दिली. नविन लक्ष्मण बहादुर (वय ४० रा. पिंपळे गुरव) याला पोलिसांनी अटक केली आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहे.


















