न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ नोव्हेंबर २०२२) :- तात्पुरत्या स्वरुपात फिर्यादीने आरोपीला दिलेले फ्लॅट परत केले नाहीत. फिर्यादीने त्याबाबत विचारणा केली असता आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करुन दमदाटी केली. फ्लॅटचा बेकायदेशीररित्या ताबा घेवुन फिर्यादीची फसवणुक केली आहे.
फिर्यादीचे मुक्ताई पार्क, सनराईज हॉटेलचे मागे, मुकाईनगर, हिंजवडी येथील बी बिल्डींगमधील तिसऱ्या मजल्यावरील उदुमुला लक्ष्मी नरसय्या यांच्या हिश्शाचे तातीरेड्डी व्यंकट नरसस्या यांचे फ्लॅट नं. ३०१ व ३०३ व कैपु मधुसुधन रेड्डी यांचे फ्लॅट नं. ३०२ व ३०४, तसेच चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. ४०१ ते ४०४ आणि पाचव्या मजल्यावरील फलॅट नं. ५०१ ते ५०४ या फ्लॅटचा फिर्यादेत समावेश आहे.
ही घटना (दि.०१/०६/२०१९) ते आजपावेतो स.नं.२५७/३/१ येथील मुक्ताई पार्क, सनराईज हॉटेलचे मागे, मुकाई नगर, हिंजवडी (दि.०१/११/२०२२) रोजी साडेसहा वाजत श्री साईराम पी जी, बावधन येथे घडला. फिर्यादी तातीरेड्डी व्यंकटरमेश (वय ४२ वर्षे, रा. फ्लॅट नं. ४०१, टॉवर नं.६, लोधा बेलमोंडो, गहुंजे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी नयन अनिलकुमार भयानी (वय ४७ वर्षे, रा. फलॅट नं. ३, बिल्डींग नं. ३, फायु स्टार को. हौ.सो. २७, बंडगार्डन रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.