न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२२) :- सार्वजनिक ठिकाणी उभे रहात वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने लैंगिक हावभाव करून शब्द उच्चारून येणाऱ्या-जाणाऱ्यां लोकांना अडथळा निर्माण केला. सार्वजनिक शिष्टाचाराचा सभ्यतेचा भंग होईल, असे केले कृत्य.
हा प्रकार (दि.३) रोजी ३:५० वा. सुमारास बेंगलोर मुंबई हायवे सर्व्हिस रोडवरील पिंगारा लॉज समोर, बावधन येथे घडला. फिर्यादी सचिन संजिवन शिंदे (वय २९ वर्षे, रा. सर्वे नंबर ४८, भैरव नगर, आनंद पार्क, धानोरी, विश्रांतवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन महिला आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.