न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२२) :- मॅक्स इन्शुरन्समध्ये मुलीची पॉलिसी काढुन देतो, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. २०१४ ते २०२० पर्यंत फिर्यादीकडुन आरोपीने ऑनलाईन व रोख स्वरुपात रक्कमं स्विकारली. भरलेल्या पैशाची रिसीप्ट न देता, उद्या-परवा देतो असे सांगितले.
फिर्यादीचे पैसे इन्शुरन्ससाठी न भरता फिर्यादीची २,४०,००० रुपयांची आर्थिक फसवणुक केली. ही घटना २०१४ पासुन एक्सीस बँक, हिंजवडी येथे ते आजपर्यंत घडली.
फिर्यादी सयाजी रावसाहेब ओलेकर (वय ४२ वर्षे, रा. लक्ष्मी चौक, म्हातोबा ढवळे बिल्डींग, फ्लॅट २, मारुंजी रोड, मुळगाव कोकळे, ता. कवठे महाकाळ, जि सांगली) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी सचिन काशिनाथ दिसले याच्यावर गुन्हा दखल केला आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.