- पिंपळे सौदागर, मोशी, मारुंजीसह पुण्यातील गोठा मालक गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२२) :- गाई, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसीन ओैषधाचा वापर करणाऱ्या पुणे, पिंपरीतील सहा गोठे मालकांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.
विठ्ठल भिवाजी झिंजुर्डे (वय ४८, झिंजुर्डे मळा, पिंपळे सौदागर), सागर कैलास सस्ते (वय ३५, रा. सस्ते मळा, आळंदी रस्ता, मोशी),विलास महादेव मुरकुटे (वय ५७, रा. मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे), सुनील खंडप्पा मलकुनाईक (वय ५१, रा. हरेकृष्णा पार्क, टिंगरेनगर, धानोरी रस्ता), गणेश शंकर पैलवान (वय ५०, रा. डायस प्लाॅट, गुलटेकडी), महादू नामदेव परांडे (वय ५१, रा. दिघी, आळंदी रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्या गोठे मालकांची नावे आहेत.
पुणे, पिंपरीतील गोठे मालक गाई, म्हशींचे दूध वाढीसाठी ऑक्सिटोसीन ओैषधाचा वापर करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला तपासात मिळाली होती. पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, सुजीत वाडेकर, पांडुरंग पवार, मारुती फारधी, प्रवीण उत्तेकर, मारुती पारधी आदींनी ही कारवाई केली.