न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मार्च) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगवी येथील
त्यांच्या अर्धाकृती पुतळयास महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास नगरसदस्या माई ढोरे, शारदा सोनवणे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सामाजिक कार्यकर्ते हिरण सोनवणे, अनुष सोनवणे, रामकृष्ण राणे, रेश्मा साळवी, कल्पना सोनवणे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.











