न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १ मार्च) :- येथील प्रसिध्द वकील वर्षा नितीन तिडके (कांबळे) यांची भारत सरकारच्या नोटरीपदी निवड झाली आहे. अॅड तिडके या महीलांच्या कायदेशीर हितासाठी व कायदे जनजागृतीसाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.
त्या विविध संस्थावर कायदे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल समाजाच्या विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांची नियुक्ती भारत सरकारच्या कायदा मंत्रालयाकडून करण्यात आलेली आहे.











