न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मार्च) :- केंद्र व राज्य शासनाचे सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असुन, घरकुल प्रकल्पातील ५ सोसायट्यांच्या इमारती मधील एकुण २१० लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत आज काढण्यात आली.
अँटो क्लस्टर, चिंचवड येथे झालेल्या संगणकीय सदनिका सोडत महापौर राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते काढण्यात आली. या कार्यक्रमास सहा. आयुक्त चंद्रकांत इंदलकर, (झोनिपु) सहा. आयुक्त आण्णा बोदडे (माहीती व जनसंपर्क), कार्यालयीन अधिक्षक महेंद्र चौधरी व मुख्य लिपिक सुनिल माने, राजेश जाधव, लिपिक अंजली खंडागळे, मोहिद्दीन शेख, सुवर्णा केदारी, संकेत लोंढे तसेच समन्वयक अशोक हंडीबाग, दर्शन शिरुडे, आश्विनी शिंदे व आरती शहारे
यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. १२५ इमारत क्र. डी-२४ चे अध्यक्ष अनिल गंगारात भोसले, सोसायटी क्र. १२६ इमारत क्र. डी-२३ चे अध्यक्ष प्रल्हाद रामभाऊ कांबळे, सोसायटी क्र. १२७ इमारत क्र. डी-२१ चे अध्यक्ष गोविंद गुंडेराव तांबवाडे, सोसायटी क्र. १२८ इमारत क्र. सी-३३ चे अध्यक्ष संजय कोंडिबा शिंदे व सोसायटी क्र. १२९ इमारत क्र. डी-२२ चे अध्यक्ष गजानन कडू बेदरे यांचा सहा. आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी लाभार्थींनी आता हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. घराचा वापर स्वत: करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारत भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे असे लाभार्थींना महापौर राहुल जाधव यांनी संदेश दिला.
यावेळी चंद्रकांत इंदलकर सहा.आयुक्त यांनी प्रकल्पाची माहिती, घराचा वापर, येणारे देयके व बँकेचे हप्ते वेळेवर भरणेबाबत मार्गदर्शन केले. रमेश भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व आभार प्रदर्शन केले.











