न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२२) :- एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपकाळात ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी गैरसोय विचारात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून ग्रामीण भागात पीएमपी सेवा सुरू केली होती.
या बसमार्ग संचलनासाठी येणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत असल्याने पीएमपी प्रशासनाने या मार्गावरील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील या ४० मार्गावर बससेवा पूर्ववत सुरू करावी, असे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला कळविले. ४० पैकी ११ मार्गावर एसटी बस सेवा सुरू झाल्याचे एसटी प्रशासनाने पीएमपीला कळविल्यानंतर ११ मार्ग बंद करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला.
या मार्गावरील पीएमपी होणार बंद..
१) २३१ – स्वारगेट ते काशिगगाव
२) २३२ – स्वारगेट ते बेलावडे
३) २९३ कापूरहोळ ते सासवड
४) २९६ – कात्रज सर्पोद्यान ते विझर
५) २११ सासवड ते उरुळीकांचन
६) २२२- हडपसर ते मोरगाव
७) २१०- हडपसर ते जेजुरी
८) २२७ अ. (बीआरटी मार्केट यार्ड ते खारावडे / लव्हार्डे
९) १३७ (बीआरटी) वाघोली ते राहूगाव, पारगाव सालू मालू
१०) चाकण आंबेठाण चौक ते शिक्रापूर फाटा
११) २२० सासवड ते यवत
ग्रामीण भागातील बस मार्ग बंद केल्याने पीएमपीकडून २४ नोव्हेंबरपासून पुणे व पिंपरी चिंचवड शहर हद्दीतील या भागांवर जादा बसचे नियोजन केले आहे.
१) एच ९ डेपो कोअर सिटी- हडपसर ते मांजरी बुद्रूक
२) २९१ कात्रज ते हडपसर
३) २३५ (बीआरटी) कात्रज ते खराड़ी
४) ११५ (बीआरटी) पुणे स्टेशन ते हिजवडी माण फेज-३
५] ३०१ (बीआरटी) शेवाळेवाडी ते कात्रज
६) २९९ (बीआरटी) कात्रज, गुजरवाडी स्टैण्ड ते भोसरी
७) ५७ पुणे स्टेशन ते वडगाव / वेणूताई
८) के १२ डेपो कोअर सिटी-कात्रज ते जांभूळवाडी
९) २३३ (बीआरटी) मार्केट यार्ड ते पौडगाव
१०) ३२४- भोसरी ते हिंजवडी माण फेज-३
११) १४८ अ- भोसरी ते भेकराईनगर