न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२२) :- अनोळखी इसमाने फिर्यादीला फोन करून तो फिर्यादीच्या ओळखीचा इसम बोलत असल्याचे भासवले. फिर्यादीच्या मोबाईलवर गुगल पेव्दारे ५०,००० रक्कम पाठविल्याचा खोटा मेसेज पाठवला.
फिर्यादी यांना विश्वासात घेवुन फिर्यादीकडुन रु. १,००,००० रुपये रक्कम गुगल पे व्दारे स्विकारुन पैसे परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे. हा प्रकार (दि. २४/६/२०२२) रोजी सायं ७.३० वाजेच्या सुमारास बी-४०३, प्रगती एम्पायर सेक्टरनं ९, मोशी प्राधिकरण येथील फिर्यादीच्या घरी घडला.
७० वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी ९८६०४२५८९३, ९३३६४४०९५९, ७०१७४५८२१२ या अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन अब्दुल या नावाने बोलणाऱ्या अनोळखी इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.