- अल्पवयीन मुलीच्या आईची पोलिसात धाव; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ नोव्हेंबर २०२२) :- १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना तिला आरोपीने रस्त्यात अडवले. ” तुम मुझे बहुत पसंद हो, मेरे पास बहुत पैसा है, तुम मेरे साथ लॉज पर आती क्या? लॉज पर जाकर मजा करेंगें? असे म्हणत आरोपीने मुलीचा हात पकडण्याचा प्रयत्न केला.
तिच्या मनास लज्जा उत्पन्न केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. २८) रोजी सकाळी ११ २० वा. सुमारास गणेशनगर येथील बसस्टॉप जवळ, भोसरी येथे घडला.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने आरोपी दिनेशकुमार साधुराम (वय ३३ वर्ष, रा. हनुमान मंदिराजवळ, गवळीमाथा, भोसरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.