न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मार्च) :- छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे गाजलेले अभिनेते आणि शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचं ‘शिवबंधन’ तोडून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह असलेल्या घड्याळाची प्रतिकृती देऊन पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. कोल्हे यांच्यासारखा लोकप्रिय चेहरा व फर्डा वक्ता पक्ष सोडून जाणं हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसं झाल्यास त्याचा सामना शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होईल.











