न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२२) :- एक गुंठा जागेवरील आर.सी.सी बांधकामातील घरासह खरेदीखत करुन देतो, असे आमिष आरोपींनी फिर्यादीला दाखविले. त्यासाठी वेळोवेळी बँक खात्यामार्फत तसेच रोख स्वरुपात ३२,५०,००० रुपये घेतले.
दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत करुन न देता कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यार पत्र व त्या आधारे साठेखत नोटरी स्वरुपात करुन देवुन फिर्यादी यांची दिशाभुल करीत फसवणुक केली आहे.
ही घटना (दि. १६/०५/२०१९ ते आजपर्यत) सर्वे नं १३७ हिस्सा नं १/१ येथील सीटीएसनं ४३१७, भोसरी येथे घडली. महिला फिर्यादी यांनी आरोपी महिला, नितीन छगन भांडवलकर (रा. वाटेफळ, ता. परांडा जि.उस्मानाबाद) (पुर्णनाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.